नेवासे :- ज्ञानेश्वर मंदिरामागील कापूरडोह येथे प्रवरानदीत गुरुवारी वाहून गेलेल्या सोमनाथ गांगुर्डे (३०, मारूतीनगर) या तरुणाचा मुतदेह ७५ तासांनी रविवारी दुपारी नदीपात्रात सापडला.
मुसळधार पाऊस व मुळा धरणातून सोडलेले पाणी यामुळे आलेल्या पुरामुळे मुळा व प्रवरा नदीवरील तिन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले होते. १५ सप्टेंबरनंतर सर्व फळ्या टाकल्याने बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला होता.

पुराच्या पाण्यात गुरुवारी दुपारी गांगुर्डे हा तरुण वाहून गेला. त्याचा शोध चालू होता. मध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नव्हता.
मध्यमेश्वर बंधाऱ्यातील फळ्या मोकळ्या करून पाणी सोडल्याने पातळी कमी झाली. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सोमनाथचा मृतदेह ज्ञानेश्वर मंदिरामागील नवीन बंधाऱ्याजवळ जलपर्णीच्या पानंदीत सापडला.
- निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्याला धोका? आमदार ओगलेंचा इशारा!
- शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी मनोहर पोटेंची निवड, श्रीगोंद्यात पक्ष बळकटीसाठी नवी जबाबदारी
- चौंडीत मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीला वेग! तीन हेलिपॅडसह मंत्र्यासाठी खास AC रूमची असणार व्यवस्था
- अहिल्यानगरमधील खासगी शाळांना पोर्टलवर नोंदणी करणे सक्तीचे, शासनाकडून प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू
- Mahayuti Report Card : महायुती सरकारच्या १०० दिवसांत कोण काय केलं ? महायुतीच्या कामगिरीत आश्चर्यकारक निकाल !