‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या वहाडणेंचे रूप जनतेला कळले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- विकासकामांच्या नावाखाली मिळाणारा मलिदा हातातून निघून जात असल्याने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे मानसिक संतुलन बिघडले अाहे. त्यामुळे विकास कामांना विरोध केला असे म्हणत आमच्यावर आरोप करत आहेत .

त्यांच्या खासगीत बोललेल्या गोष्टी उघड केल्या तर त्यांना शहरात तोंड दाखवणे अवघड होईल, माझ्यावर दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा ठेकेदार विजय कन्स्ट्रक्शन यांचे तीन कोटींचे बिल काढले मला व कुठलाही सहीचा अधिकार नसताना मी पैसे खाण्यापेक्षा त्यांनीच पैसे घेतले,

असे आरोप उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी केले.नगराध्यक्ष वहाडणे यांनी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला मंगळवारी भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन वहाडणे यांच्या आरोपला प्रत्त्युत्तर दिले. पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,

विजय वाजे, रविद्र पाठक योगेश बागुल, कैलास जाधव, शिवाजी खाडेकर, जनार्दन कदम, दत्ता काले, विनोंद राक्षे, बबलू वाणी, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, आरिफ कुरेशी आदी उपस्थित होते. निखाडे म्हणाले, नगराध्यक्षांच्या चुकीच्या कामांना मी सतत विरोध करत असतो. त्यामुळे ते माझी बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहे.

शाळकरी मुलासारखे बालिशपणा करून एकमेकांमध्ये भांडणे लावत आहेत. शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात वहाडणे अपयशी ठरल्यामुळे त्याचे खापर आमच्यावर फोडत आहेत. आता आठ कोटीचा मलिदा गमावल्याचे वैफल्य वहाडणे यांच्या वागण्या-बोलण्यातून स्पष्टपणे दिसत आहे.

पातळी घसरल्याने आमचा आवाज दाबण्यासाठी व्यक्ती द्वेषातून आरोप करून बदनामी करण्याचा व एकमेकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न वहाडणे करीत आहेत, वैयक्तिक गोष्टी आम्ही बाहेर काढल्या तरी यांना शहरातून फिरणे मुश्कील होईल, पण ती आमची संस्कृती नाही अशा शब्दात उपनगराध्यक्ष निखाडे यांनी त्यांच्यावर टीका केली.

नगरसेवक कैलास जाधव म्हणाले , माझे कुठलेही अतिक्रमण नाही ती जागा रितसर एका संघटनेकडून विकत घेतली आहे . नगराध्यक्ष यांनी लावालावीचे धंदे बंद करावे, साध्या मनाचा आव आणू नय . अण्णा हजारे यांच्या साक्षीने शपथ घेऊन ना खाऊगा ना खाने दूंगा म्हणणारे वहाडणे यांचे खरे रूप जनतेला कळले आहे .

माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे म्हणाले, पदरचे पैसे आणून प्रभागातील विकास कामे करत आहेत. माझ्या प्रभागातून नगराध्यक्ष निवडणुकीत वहाडणे यांना कमी मते मिळाल्याचा राग मनात धरून ते माझ्या प्रभागात विकास कामे होऊ देत नाहीत. मी कोणतेही कामे स्वतः करत नाही.

त्यामुळे मला मलिदा मिळण्याचा प्रश्न नाही , जो मलिदा मिळतो तो नगराध्यक्ष यांनाच मिळतो. नगराध्यक्ष यांनी गेली चाळीस वर्षे फक्त शिव्या घालण्याचे काम केले आता सध्या दिशाभूल करत आहेत. सर्वे नंबर २१० वर ज्या गिरमे परिवाराचा उल्लेख वहाडणे करत आहे ती जागा प्रत्यक्षात येवला येथील गुजराथीच्या नावावर आहे.

गिरमे यांचा त्या जागेशी कुठलाही संबंध नसताना वहाडणे आरोप करीत आहेत. नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या जवळचे सर्व कार्यकर्ते दूर गेले आहेत.

दत्ता काले म्हणले, कर्तव्य शून्य, बेछूट व बेताल वक्तव्य करणाऱ्या वहाडणे यांची ३० वर्षाची राजकीय कारकीर्द केवळ चार आण्याच्या खडूत बोर्डबाजी करून मोठ्यांची इज्जत घेण्यापलीकडे व काळे कोल्हे यांच्या नावाने शंखनाद करण्यापलीकडे काय ? असा टोला त्यांनी लगावला.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe