अहमदनगर ब्रेकिंग ! कामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- राहुरी तालुक्‍यातील निंभोरे येथील गौरव नावाच्या २२ वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गौरव जिजाबापु सांगळे, वय २२ हा तरुण कामासाठी घराबाहेर पडला. तो घरी जेवणासाठी आला नाही तेव्हा त्याचा नातेवाईकांनी शोध सुरू केला.

त्याची मोटारसायकल ही दाढ शिवारात नदीच्या पुलावर मिळून आली. नदीच्या पाण्यातही गौरवचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आळा नाही.

जवळच असलेल्या विहिरीत गौरव सांगळे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तशी खबर चंदू गजाबा सांगळे, रा. निंभोरे, ता. राहुरी यांनी आश्वी पोलिसात दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून

गौरव सांगळे याचा विहिरीत नेमका मृत्यू कसा झाला? काही घातपात आहे? याचा पुढील तपास सफो पवार हे करीत आहेत. गौरव सांगळे या तरुणाच्या अकस्मात मृत्यूमुळे निंभोरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News