पतसंस्थेत नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने पतसंस्थेला गंडविले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेले डिएएचयुए कंपनीचे डीव्हीआर आणि 36 हजार 870 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.

दरम्यान हि चोरीची घटना केडगावातील कल्याणी पतसंस्थेत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, केडगावातील कल्याणी पतसंस्थेत विकास आजीनाथ सदाफुले (रा. केडगाव) हा नौकरीस आहे.

दरम्यान सदाफुले हा कल्याणी पतसंस्थेत नोकर आहे. त्याने पतसंस्था बंद असतानाही ती विनापरवानगी उघडली. पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेले डिएएचयुए कंपनीचे डीव्हीआर आणि 36 हजार 870 रुपयांची रोकड चोरून नेली.

स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता सदाफुले याने ही चोरी केली आहे, अशी फिर्याद मुकेश नंदकुमार जोशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दरम्यान फिर्यादीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कर्मचारी विकास आजीनाथ सदाफुले (रा. केडगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe