राहुरी :- तुला मूलबाळ होत नाही, तू वांझोटी आहेस. नवीन कार घेण्यासाठी वडिलांकडून एक लाख रूपये आण, असे म्हणत सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
वांबोरी शिवारातील जरे यांच्या गट क्रमांक ७३१ मधील शेततळ्यात ही घटना शनिवारी घडली. तरूणीचे वडील बाळासाहेब त्रिंबक पटारे (पुलवाडी, वांबोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सासरच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पती अंबादासला ताब्यात घेतले आहे.

कविता पटारे हिचा २००९ मध्ये मानोरी येथील अंबादास वाकळे याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या ३ वर्षांनंतरही मूलबाळ न झाल्याने पती अंबादास, सासू हिराबाई यांच्याकडून कविताचा छळ सुरू झाला. मानसिक छळ सुरू असतानाच सासरच्या लोकांनी नवीन कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून तगादा सुरू केला.
कविताच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने कारसाठी पैसे देणे शक्य नव्हते. या त्रासाला कंटाळून कविता सासरच्या घरातून बाहेर पडली. सोमवारी सकाळी वांबोरी येथील जरे यांच्या शेततळ्यात तिचा मृतदेह आढळला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.
या तरूणीला पाण्याबाहेर काढल्यानंतर तिची ओळख पटण्यास मदत झाली. या घटनेने सासर व माहेरच्या लोकांचा वाद उफाळून आल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. कविताचे वडील बाळासाहेब पटारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरूध्द विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लावलेल्या १००टक्केच्या फलकावरून संपूर्ण तालुक्यात तणाव !
- उपमुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर श्रीगोंद्यातील आंदोलन स्थगित: बारा दिवस सुरू होते भजन कीर्तन आंदोलन
- पारनेर न्यायालयाच्या ‘त्या’ अभिप्रायानंतर आझाद ठुबेसह २१ आरोपींबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- महिला कंडक्टरनेच प्रवाशाला केली मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल
- एक असाही विवाह : मंदिरातील लग्न वधुवरासह वऱ्हाडी मंडळी पोहोचली थेट पोलिस ठाण्यात