अहमदनगर ब्रेकिंग : महिलेने बाथरूममध्ये गळफास घेवून संपविले जीवन, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नगर शहरातील तपोवन भागातील एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाढदिवसासाठी नेवासा येथे जाण्यावरून झालेल्या वादातून ‘ति’ने बाथरूममध्ये गळफास घेत जगाचा निरोप घेतला.

नगरच्या तपोवन रोडवरील साईनगरमध्ये गुरूवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा आज तोफखाना पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. प्रतीमा दीपक दाणे (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती दीपक दाणे आणि सासरे प्रभाकर दाणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दाणे कुटुंब हे नेवासा फाटा येथील असून ते तपोवन रोडवरील साईनगर भागात राहतात. गत दोन वर्षापासून दीपक हा दारू पिवून तिला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. 4 मार्चला तिचा वाढदिवस होता. वाढदिवसासाठी राहते गावी जाण्यावरू दीपक आणि प्रभाकर बापलेकांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली.

त्यातून तिने राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत प्रतिमाचे वडिल भानुदास शंकर कोरडे (रा. चिकलठाण, औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News