अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- मोठ्या आशेने ते दोघेजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. ते पंढरपूर जवळ आले देखील, मात्र मालवाहू ट्रकची धडक बसली अन एका क्षणात सर्व काही संपलं. त्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील बबन महाराज घोडके (वय ५७) व रमेश गाडेकर (वय ६२, रा. सलाबतपूर, ता. नेवासा) हे दोघे दुचाकीने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते.
यावेळी करमाळा – पंढरपूर रस्त्यावर चौदा टायर मालवाहू ट्रक व त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात बबन महाराज घोडके व रमेश गाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
बबन महाराज घोडके यांच्या पार्थिवावर दहिगावने येथे गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दघ्नेश्वर शिवालयाचे प्रमुख गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे यांच्याकडून त्यांनी अध्यात्माचे धडे घेतले होते. त्यांचा अध्यात्मिक अभ्यास व पाठांतर वाखाणण्याजोगे होते.
परिसरात त्यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध होत असत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी घोडके कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|