पोलीस असल्याचे बतावणी करत महिलेवर केला अत्याचार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-सोशल मीडियाच्या माध्यमातून शिर्डीतील महिलेशी ओळख करून शिर्डी येथे पोलीस असल्याचे सांगून पोलीस भरतीत मदत करण्याचे आश्वासन देत बीडच्या तरुणाने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तरुणाला अटक केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण किरण महादेव शिंदे याची शिर्डी येथील महिलेशी मिशो ॲपच्या माध्यमातून ओळख झाली.

त्यांनतर त्याने तिच्याशी मैत्री केली. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो टाकून शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवले. तुला पोलीस भरतीमध्ये मदत करतो.

तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर, असे सांगत त्याने त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर तो तोतया पोलीस असल्याचा फिर्यादीला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बु्क्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर सदर महिलेने राहाता पोलीसात फिर्याद दिली . तिची फिर्याद नोंदवून घेत पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या प्रकरणी तोतया पोलीस किरण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

गुन्ह्याचा तपास सहा. पो नि प्रशांत कंडोरे हे करत असून या आरोपीने तोतया पोलीस बनून अजून कुणाची फसवणूक केलीय का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe