अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात सुनील लहानु रहाणे, वय ४५ थंदा नोकरी रा. शारदा कॉलनी संगमनेर हे त्यांच्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता पाईपचे झाकण काढत असताना
तेथे आरोपी भाऊ संदीप लहानु रहाणे रा. चंदनापुरी हा आलला व सुनील याच्या डोक्यात दगड मारुन शिवीगाळ करत डोके फोडले. पुन्हा जर’ शेतात पाय ठेवला तर याद राखा, अशी धमकी दिली.
जखमी सुनील लहानु रहाणे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणारा आरोपी संदीप लहानु रहाणे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सफो शेख हे पुढील तपास करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|