अहमदनगर जिल्ह्यात चोर दरोडेखोरांचेच राज्य ! कारने भरलेला कंटेनरच पळवून नेला…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- सध्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संपली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रोज चोरी,लूटमार,खून, अपहरण या घटना घडत आहेत आणि पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.

त्यामुळे या लोकांचे धाडस प्रचंड वाढले आहे. आतापर्यंत महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून लूटमार केल्या जात असल्याच्या रोज घटना घडत आहेत.

मात्र आता तर कंटेनर चालकाला मारहाण करून चक्क कारने भरलेला कंटेनरच पळवून नेला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्याच्या पुढे घडली आहे.

यात ९०लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चालक हिदायत हनिफ खान (वय२९ रा. छरोरा.हरियाणा) हा कंटेनर (क्र.एचआर ३८डब्लु ८१२०) हा मारुती सुझुकी कार भरून दिल्लीकडून गोवाकडे जात होता.

तो संगमनेर तालुक्यातील हिवारगाव पावसा टोल नाक्याच्या पुढे गेल्यावर चहा पिण्यासाठी थांबला व कंटेनरची हवा चेक करत असताना एका अनोळखी इसमाने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली.

यावेळी चहा टपरीवाला मध्ये आला असता त्याला देखील मारहाण करून फोनवर इतर ४ साथीदार बोलावून घेत. या सर्वांनी चालकाला मारहाण करून कारने भरलेला कंटेनर ,२५००रोख रक्कम व एटीएम कार्ड असा एकूण ९०लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळून गेले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News