चाकूचा धाक दाखवून एकास लुटले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, अनेक लहान मोठे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यामध्ये करण्याबरोबरच मारहाण देखील केली जात आहे. अशीच एक घटना जिल्ह्यातील राहाता शिर्डी रोडवरील शिव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत लावलेल्या बस मध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या गळ्याला चाकु लावुन पॅन्टच्या खिशात ठेवलेली तिकिटाची अठरा हजार पाचशे रुपये काढून हेल्पर लाकडी दांडक्याने मारहाण केली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, राहाता शिर्डी रोडवरील शिव रस्त्यावर मोकळ्या जागेत मध्यप्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील येथील एक बस थांबलेल्या असतात. त्यावेळी जुना नंबरच्या मोटरसायकल वरील ठिकाणी येऊन त्यातील एकाने लाकडी दांडक्याने खिडकी उघडून आत मधील दरवाजा उघडला .

बसमध्ये घुसून बसंत कुमार मुनीलाल गौडा त्यांच्या गळ्याला चाकु लावुन पॅन्टच्या खिशात असलेले १८ हजार पाचशे रुपये बळजबरीने काढून घेतलेव व पाठीत लाकडी दांडक्याने मारहाण करून पोबारा केला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात बसनकुमार कुमार मुन्‍नीलाल (रा. उज्जैन) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News