अहमदनगर- ’नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून भूसंपादनावरून काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत,’ तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही लवकरच सुरु होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. तसेच पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याची कार्यवाही करावी आणि मदतीचा अहवाल सरकारला तातडीने पाठवावा,’ अशी मागणी विखे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ’नगरमधील उड्डाणपूल व शहराबाहेरून जाणारा बायपास दुरुस्ती हे विषय लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे; मात्र, भूसंपादन करताना त्याबदल्यात देण्यात येणार्या मोबदल्याविषयी काही तांत्रिक अडचणी आहेत. हा मोबदला जास्त मिळावा, अशी ज्यांची जागा यासाठी गेली आहे, त्यांची मागणी आहे. हा प्रश्नही लवकर सोडवण्यात येईल.
नगर शहरातील उड्डाणपूल झालाच पाहिजे, यासाठी येथील जनतेने आपल्याला मते दिले आहेत, याचा विसर आम्हाला पडलेला नाही. काही तांत्रिक बाबींमुळे त्याची पूर्तता होऊ शकली नव्हती. आता यासंदर्भात संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन पुढील सूचना दिल्या आहेत. निश्चितपणे उड्डाणपुलाचा तसेच बायपास रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लागेल,’ असेही विखे यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात बातम्या वाचण्यासाठी लाईक करा https://www.facebook.com/Ahmednagarinshortnews
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गावर तयार होणार 3 नवीन रेल्वे स्थानक
- महाराष्ट्रातून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्यांसाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ! ‘या’ ९ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा
- प्रतिक्षा संपली ! ‘या’ मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हफ्ता, वाचा सविस्तर
- मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान ! मेट्रोच्या आणखी एका मार्गाला मंजुरी, कसा असणार रूट?
- ब्रेकिंग: पुणे अहिल्यानगर मार्गावर ५४ किलोमीटरचा उड्डाणपूल अन् मेट्रो मार्ग तयार होणार, कसा असणार संपूर्ण प्रकल्प?













