अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत २ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कान्हेगाव, वेस, तिळवणी, मुर्शतपूर, देर्डे चांदवड, सावळगाव,
ओगदी आदी गावातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये इजिमा १२, इजिमा २ ते प्रजिमा ५ जोड रस्ता (कान्हेगाव ते वारी १ किमी),
इजिमा १३ जिल्हा हद्द ते वेस ते काकडी १ किमी, इजिमा १४ जिल्हा हद्द ते तिळवणी, तिळवणी ते येवला हद्द १ किमी., इजिमा १६० टाकळी,
मुर्शतपूर, चांदगव्हाण, मुर्शतपूर गाव ते मुर्शतपूर फाटा २ किमी., इजिमा २१३ हिंगणी ते देर्डे चांदवड ते डाऊच १ किमी., इजिमा ४ ते प्रजीमा १३ सावळगाव ते ओगदी १ किमी.,
इजिमा ६, इजिमा ४ ते ओगदी पढेगाव गाव रस्ता ओगदी १ किमी. आदी रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. सर्वच रस्त्याच्या निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|