अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-राज्यात सत्ता नसल्यामुळे तसेच तालुक्यातील विरोधी लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने गेल्या १५ वर्षात शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते.
आता हे प्रश्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित मार्गी लावून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम येत्या ५वर्षात केले जाईल,असा विश्वास माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केला.
तनपुरे राहुरी नगरपालिकेने आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक बापूसाहेब रणसिंग होते.
यावेळी नगराध्यक्षा अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पोपळघट, चंद्रकांत खैरे, संजय राका, गणेश खैरे आदी प्रमुख उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले,नगरपालिकेच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने जी आश्वासने दिली होती,ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही आश्वासनाची पूर्तता करताना राज्यात आपल्या विचाराचे सरकार नसल्याने अनेक अडचणी आल्या.
विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील विशेषत: शहरातील मतदारांनी प्राजक्त तनपुरे याचे विश्वास टाकून त्यास चांगल्या मताने निवडून दिले.
तसाच विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी ठेऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी टाकली. त्यामुळे शहर,राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.
लवकरच शहरासाठी २८कोटी रुपयाची सुधारित पाणी योजनेचे काम सुरु होईल.जॉगिंग ट्रॅक,गटारी,रस्त्याचे कॉकरीटीकरणाची कामे सुरु आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|