अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- अहमदनगर शहरात व ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाली असून आज कोरोनाचा विस्फोट झाला. दिवसभरात ३२७ कोरोनाबाधित आढळले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ८४२ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४४१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५० आणि अँटीजेन चाचणीत १८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत १७, कोपर गाव १४, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ०१, राहाता २४, संगमनेर १६, शेवगाव १४, श्रीगोंदा ०५, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७, अकोले ०४, कर्जत ०२, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२, पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहाता २७, राहुरी ०६, संगमनेर १९, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, नेवासा ०१, पारनेर ०६, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ९४, अकोले ११, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव १७, नगर ग्रामीण १८, नेवासा ०५, पारनेर ०३, पाथर्डी ०७, राहाता २७, राहुरी १०, संगमनेर ४२, शेवगाव १८, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:७४८४२
- उपचार सुरू असलेले रूग्ण: १४४१
- मृत्यू:११५४
- एकूण रूग्ण संख्या:७७४३७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|