अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणीस सुरुवात; पंचनामे करण्याच्या सूचना.
जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये मिळून सध्याच्या स्थितीमध्ये 49 हजार 930 दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास 50 टीएमसी पाणीसाठा.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या दारुण पराभवानंतर आता विखे पितापुत्रांविरोधात भारतीय जनता पक्षातच नाराजी, भाजपच्या नगर शहर जिल्हा उपाध्यक्षांनी विखे पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळून टीका करत नैतिक जबाबदारी स्वीकारुन खासदारकी व आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात हात टाकून चालणाऱ्या भाजप-शिवसेनेतील पदासाठीचा वाद स्वार्थी हेतूने; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका.
पैशाच्या वादातून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बाळू बजरंग पवारची निर्घृण हत्या, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.