उत्तरेतील ‘ते’ राजकारणी शिवसेना नेत्यांच्या संपर्कात; तर्कवितर्कांना उधाण….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शिर्डी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांची भेट घेतली.

दरम्यान त्यांची हि भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोते कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाणार कि काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे यांचे समर्थक मोठ्या प्रमणावर भाजपात दाखल झाले. शिर्डीतील कट्टर भाजपवासी व त्यात आ. विखे यांचे कार्यकर्ते या सर्वांची गर्दी भाजपात झाली आहे.

आगामी काळात शिर्डी नगरपंचायतची निवडणूक होणार आहे. या नगरपंचायतीत केवळ 17 जागा आहेत. आणि या भाऊगर्दीत आपण कुठे असू याबाबत अनेक कार्यकर्त्यांना चिंता लागली आहे. भाजपामधील कार्यकर्त्यांच्या या भाऊगर्दीत भविष्यात मोठी अडचण निर्माण होवू शकते.

त्यामुळे कैलासबापू कोते आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe