निर्णय होऊन १० दिवस उलटल्यानंतरही ती पाच गावे सरपंचांच्या प्रतिक्षेत….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- राहुरी तालुक्यातील पाच गावांच्या सरपंचपदाचा तिढा सुटला खरा; पण प्रत्यक्षात सरपंच निवडीचा प्रोग्रामच ग्रामपंचायतींना मिळालेला नाही. निर्णय होऊन १० दिवस उलटल्यानंतरही सरपंचांची प्रतिक्षा आहे.

निवडीचे घोडे अडले कुठे? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. वळण ग्रामपंचायतीची ११ जागांसाठी १५ जानेवारीला पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यानंतर १० फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच निवडीचा प्रोग्राम जाहीर झाला.

तेव्हा वळणसह तालुक्यातील अन्य चार ग्रामपंचायतींमध्ये केवळ उपसरपंचाची निवड झाली, कारण वळण येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला राखीव होते; पण प्रत्यक्षात त्या जातीचा पुरुष उमेदवार निवडून आलेला होता.

अशीच परिस्थिती राज्यातील विविध जिल्ह्यात निर्माण झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील ३५ तर राहुरी तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत औरंगाबाद हायकोर्टात काहींनी याचिका दाखल केली होती. शासनाने याची तातडीने दखल घेत २५ फेब्रुवारीला तालुक्याच्या ठिकाणी संबंधित गावच्या सरपंचपदाचा तिडा सोडवला; मात्र प्रत्यक्षात अजून सरपंच निवडीचा प्रोग्राम ग्रामपंचायतीला मिळालेला नाही.

त्यामुळे सरपंच निवड होऊ शकलेली नाही. यामुळे सदस्य, ग्रामस्थ व सरपंचपदाच्या उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe