पसार व्यापाऱ्याची माहिती सांगा बक्षिस मिळवा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील किराणा व भुसार आडत व्यापारी बंधुंनी माळवाडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी बुडवून पोबारा केला होता.

त्याला एक महिना पूर्ण झाला. पोलीस तपासात अद्याप ठोस धागेदोरे हाती न लागल्याने संतप्त पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीतील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन व्यापाऱ्याच्या परिवारातील फोटो प्रसिद्ध करून माहिती देणाऱ्यास पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

माळवाडगाव येथे २० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर आलेल्या या व्यापारी कुटुंबाने बायका मुलांसह महिन्याभरापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गावाला झोपेत ठेवून पळ काढला.

माळवाडगावसह पंचक्रोशीतील गावातील हजारो शेतकऱ्यांचे २५ कोटी, बँका, पतसंस्था, भिशी चालक, सोयाबीन मील, किराणा, भुसार व्यापारी अशांचे एकूण ४० कोटी रूपयांची बुडवणूक करून इमारत, कार, टेम्पो, पिक अप जागेवर सोडून पलायन केले.

मुथ्था परिवाराचे सर्व मोबाईल स्वीच ऑफ असले तरी एक मोबाईल काही दिवस सुरू असल्याचे निदर्शनास आले. एक महिन्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची पोलीस चौकशी करत असून, याव्यतिरिक्त कार, वाहने, मुख्य दुकानासह, घर गोडावूनमधून लंपास झालेल्या

मालाचा तपास तालुका पोलिसांनी या आठवड्यात जोमाने सुरू केला आहे. तब्बल एक महिना पुर्ण झाल्याने पोलीस पथकास मदत करणारे कार्यकर्त्यांसह पिडीत शेतकऱ्यांनी बैठक घेऊन मुथ्था परिवाराचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीचे नांव गोपनीय ठेवण्यात येऊन माहिती देणाऱ्यास पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने पाच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!