बँकेच्या निवडी गुणवत्तेवर नव्हे तर नातेवाईकांच्या निकषावर!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्हा बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी या गुणवत्तेवर नव्हे तर नातेवाईकांच्या निकषावर झालेले आहेत. ‘सोधा’चे राजकारण जिल्ह्याला नवीन नाही. नूतन अध्यक्ष उदय शेळके हे थोरात यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तर उपाध्यक्ष माधवराव कानवडे हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहे.

त्यामुळेच त्यांना संधी दिल्याचा आरोप श्रीरामपूरचे माजी आमदार व जिल्हा बँकेची नूतन संचालक भानुदास मुरकुटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरकेला आहे. नुकतीच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीला काही तास उलटत नाही तोच नाराजीचा सूर उमटला आहे. महसूल मंत्री थोरात यांचे नातेवाईक असणारे शेळके हे राष्ट्रवादी ,आमदार मोनिकाताई राजळे या भाजपात, मंत्री असणारे शंकराव गडाख शिवसेनेत आणि ते स्वत: काँग्रेसमध्ये आहेत.

त्यामुळे स्वत: च्या माध्यमातून थोरात त्यात जिल्ह्यातील चारही पक्ष चालवत आहेत. यासंर्भात आपण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

वास्तवात बँकेची निवडणूक पक्ष जोडे बाजूला ठेवण्यात आले बँकेसाठी स्थापन केलेल्या शेतकरी विकास आघाडीचे राजकीय पक्षांसोबत भाजपाचे कर्डिले राजळे ,गायकर ,आणि कोल्हे सोबत आले मात्र पदाधिकरी निवडीनंतर आता बँक ही तर त्यांच्या ‘सोधा’ गटाच्या ताब्यात गेली आहे असे ते म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe