अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मतदारसंघाचा विकास हेच आपले ध्येय असून, विकास कामासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यानुसार शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तीन पुलांच्या बांधकामासाठी शासनाकडे मागणीप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ८ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
परिणामी या गावांतील तसेच परिसरातील नागरिकांचे दळणवळण सोईस्कर होईल, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाचे दि.१मार्च रोजीच्या शासन निर्णयामध्ये शेवगाव तालुक्यातील लोळेगाव- वडुले बुद्रुक रस्त्यावरील ढोरानदीवर ७० मीटर लांबीच्या पुलाच्या कामासाठी ४ कोटी ३९ लाख रुपये
तसेच मुंगी पिंगेवाडी रस्त्यावरील नंदीनी नदीवर ६० मीटर पुलाचे कामासाठी २ कोटी ८१ लाख रुपये तसेच पाथर्डी तालुक्यातील येळी- कोळसांगवी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम १कोटी ४६ लाख रुपयांच्या कामाचा समावेश असल्याचे आ.राजळे यांनी सांगितले.
वडुले बु.ते लोळेगाव या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत झाले असून मुंगी- पिंगेवाडी या रस्त्याचे काम चालू आहे तसेच पाथर्डी तालुक्यातील येळी कोळसांगवी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत तीन वर्षापूर्वी झाले असून कोळसांगवी येथे पुलाची आवश्यकता होती.
या तीनही रस्त्यावरील पुलाचे काम झाल्याने नागरिकांना चांगल्या प्रकारे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होतील असेही आ.राजळे यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|