सुपर स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपात भाजपला मिळाला हुकमी एक्का

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये भाजपची सभा झाली. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (७०) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन दिनेश त्रिवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजप प्रवेशाच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. आज त्यांनी भाजप प्रवेशानं या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि सुवेंदू अधिकारी हे मिथुन चक्रवर्ती यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते.

याआधी काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमंत्रण दिल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पण सभागृहात सतत गैरहजर राहिल्यामुळे पक्षांतर्गत मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी नाराजी वाढत गेली.

अखेर मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मिथुन चक्रवर्ती हे ७० वर्षांचे आहेत. हिंदी सिनेसृष्टीत अनेक दशकं त्यांनी काम केलं.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे ते राज्यसभेतील खासदारही राहिले आहेत. राज्यसभेच्या सदस्यत्वाचा २०१६च्या अखेरीस राजीनामा दिल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले.

पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच्या दोन भेटींनंतर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe