खुनी हल्ला करणाऱ्या त्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  प्रेमविवाह केल्या प्रकरणी नेवासा तालुक्यातील एका तरुणास त्याच्याच सासरच्या मंडळींकडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडले होते.

या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील नेवासा खुर्द येथील प्रशांत ऊर्फ बंटी राजेंद्र वाघ या तरुणाने 1 मार्च 2021 रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.

या विवाहास मुलीच्या घरच्या मंडळींचा विरोध होता. विवाह केलेल्या तरुणास जीवे ठार मारण्याच्या हेतूने तीन वाहनांतून 9 जण नेवाशात आले होते.

त्यांनी सादर तरुणावर जीवघेणा हल्ला केला तरुणाच्या आरडाओरड्याने परिसरातील नागरिक गोळा झाले व आरोपी पसार झाले. मात्र काही वेळातच पोलिसानी सदर आरोपींना ताब्यात घेतले.

यातील प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कनोजे, शाहीद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे, सतीश भोसले या 7 आरोपींना पोलिसांनी शनिवारीच अटक केली होती.

हे सर्व आरोपी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) तसेच बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांना काल रविवारी न्यायालयात हजर केले असता 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe