अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- आजकाल शाळा कॉलेज मध्ये मुला मुलींची नजरा नजर झाली कि लगेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. व दोघांनाही एकमेकांचा सहवास मिळवा यासाठी एखाद्या ठिकाणाचा शोध घेत असतात.
असेच एक कपल लॉजवर जात असताना अचानक तिथे नातेवाईक आले व त्यांनी या कपलवर हल्ला बोल केला. दरम्यान हा सर्वप्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गालगत एका हॉटेल समोर घडला होता.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/deaths-ciuys_202005431410.jpg)
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी शहरातील नगर- मनमाड महामार्गालगत एका लॉजवर हे प्रेमीयुगल चाळे करण्यासाठी थांबले असल्याची मुलीच्या नातेवाईकांना खबर लागली.
त्याचवेळी मुलीचे नातेवाईक त्या हॉटेल लॉजवर आले. त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडले. लैलामजनुंची त्यांच्याच नातेवाईकांनी हॉटेलमध्येच चांगली धुलाई केली.
त्या जोडप्याला वाहनातून ३० ते ४० जणांच्या टोळक्याने येऊन मारहाण करत त्यांना गाडीत टाकून दोघांना नगरच्या दिशेने नेण्यात आल्याची चर्चा होत आहे.
हे प्रेमीयुगल दोन वेगवेगळ्या समाजाचे असल्याची चर्चा होत आहे. यातील संबंधित तरुण हा कोल्हार भागातील तर मुलगी ही नगर येथील रहिवासी असल्याची चर्चा होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|