अहमदनगर :- मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे गुरूवारी पुन्हा एकदा महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा भार सोपवण्यात आला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या बदलीनंतर मोठ्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मनपाचा कारभार पाहिला होता. त्यानंतरही वेळोवेळी त्यांच्याकडे मनपाची धुरा सोपवण्यात आली. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्त भालसिंग यांची नियुक्ती झाली.
भालसिंग रजेवर असल्याने ५ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे पुन्हा आयुक्तपदाचा भार सोपवण्यात आला आहे. नगर शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून अधिकाऱ्यांसह व पदाधिकारीही निमूटपणे खड्डे असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करतात. रस्ते दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांना खड्ड्यांना सामोरे जावे लागते.

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मनपा कर्मचारी व अधिकारी निवडणुकांच्या कामात व्यग्र होते. आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय घेतले गेले नाहीत, तसेच कामांचे कार्यारंभ आदेशही दिले गेले नाहीत.
- गांधारीला का म्हणतात महाभारतातील सर्वात दुर्दैवी स्त्री? तिची हृदयद्रावक कहाणी मन हेलावून टाकेल!
- तुम्हालाही लाडकी बहीण योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- तुम्हीही दररोज RO पाणी पिताय?, मग ही बातमी वाचाच; आरोग्याबाबत WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा!
- फक्त 20 रुपयांत मिळवा तब्बल 2 लाखांचा विमा, जाणून घ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सर्व फायदे!
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार विमानासारखी बस, प्रवाशांना मिळणार विमान प्रवासासारख्या सोयीसुविधा, नितीन गडकरींची माहिती