अमरधाममध्ये अस्थीकलश कुंड बसवून देखील अस्थी रक्षाची विटंबना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अस्थीकलश कुंड बसवून देखील अमरधाम मधील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे रक्षा अमरधाम येथील कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन विटंबना होत असल्याचा आरोप करुन नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अंतोन गायकवाड व महिला अध्यक्षा शारदा गायकवाड यांनी आयुक्तांना अमरधाम मधील कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले.

शहरातील अमरधाममध्ये रक्षा कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन होणारी विटंबना थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाष लोंढे, उमेश (गणेश) कवडे, सोनाली चितळे, सुवर्णा गेनाप्पा यांच्याकडून ना हरकत दाखला घेऊन,

आयुक्तांच्या परवानगीने अस्थिकलश कुंड बसविण्यात आले. तर अस्थीकलश कुंडातील रक्षा देखील असोसिएशनच्या वतीने पैठण येथील गंगा-गोदावरी येथे विसर्जित करण्याची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे.

तरी देखील अमरधाममध्ये अस्थी रक्षा अस्थीकलश कुंडात न टाकता कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात टाकून दिल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.

अमरधाममधील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असून, सदर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe