नगर : श्रीगोंदे तालु्क्यातील बेलवंडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. शतक मच्छिंद्र यादव (वय २०, रा. दुर्गळवाडी, ता. कोरेगाव, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे बुधवारी सकाळी बेलवंडी स्थानकात थांबली होती. यादव प्लॅटफॉर्मवर उतरला होता. रेल्वेत बसल्यानंतर काही वेळानंतर तो गाडीतून बाहेर पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता.

बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या यादव याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- 30 नॉट्स वेग, 250 नौदल कर्मचारी आणि…; भारतीय नौदलाच्या ताफ्यात आली सर्वात शक्तिशाली ‘INS Tamal’ युद्धनौका!
- सकाळी उठल्यावर ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, असू शकतो पोटाचा कर्करोग!
- DMER Jobs 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन सचालनालयात 1107 जागांसाठी भरती! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती..
- जगातील टॉप रँकिंग आणि आयआयटीलाही मागे टाकणाऱ्या प्लेसमेंट्स, ‘या’ इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये मिळते मोफत शिक्षण, तेही JEE शिवाय!
- नोकरी नव्हे, व्यवसायात चमकतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली; कमावतात अफाट संपत्ती आणि नाव!