अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- आधीच कोरोना, शासनाचे बदलते धोरण तसेच आस्मानी संकट यामुळे हतबल झालेला बळीराजावरील संकटाचा पाढा सुरूच आहे. नुकत्याच एका शेतकऱ्याच्या सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे 202 डाळींब झाडे आगीत जळाली आहे.
हि दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात घडली आहे. अचानक आग लागून डाळींब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 7 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ते कोपरगाव रस्त्याच्या पश्चिमेला हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात तुकाराम तुळशीराम दिघे यांची शेतात वस्ती आहे.
वस्तीनजीक हाकेच्या अंतरावर सव्वा एकर क्षेत्रात त्यांची डाळींब बाग आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास सदर डाळींब बागेला अचानक आग लागली.
थोड्याच वेळात आग बागेत सर्वत्र पसरली. दरम्यान तुकाराम दिघे यांचा मुलगा अनिल दिघे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्यासह कुटुंबियांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र आग विझविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आगीत 202 डाळींब झाडे जळाली. डाळींब बागेवरून वीजवाहक तारा गेलेल्या असून
या तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने आग लागली असावी, अशी शक्यता तुकाराम दिघे यांनी व्यक्त केली. महसूल विभागाने जळालेल्या डाळींब बागेचा पंचनामा करावा, अशी मागणी दिघे यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|