कर्मचाऱ्यांअभावी राहुरीचे रुग्णालय आले व्हेंटिलेटरवर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना जिल्ह्यातील काही ठिकाणच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

नुकतेच राहुरी तालुक्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील लॅबरेटरी विभाग कर्मचार्‍यांविना बंद असल्याने नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

तसेच लवकर चाचण्या झाल्यास विलगीकरण व उपचार वेळेवर होऊन रोगाचा फैलाव कमी होऊ शकतो. मागील वर्षात राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील लॅबरेटरी विभागा तील कर्मचार्‍यांनी अतिशय चांगले काम करून जास्तीत जास्त तपासण्या होऊन करोना रुग्णांना दिलासा दिला.

रुग्णांना वेळेवर विलगीकरण व उपचार मिळाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राहुरी तालुक्यात चांगले राहिले. परंतु आज ग्रामीण रुग्णालयात पाहणी केली असता संबंधित लॅबरेटरी विभागात कर्मचार्‍यांअभावी बंद असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केली असता येथील दोन्ही कर्मचारी नगर जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या बदली म्हणून नेमणूक झाल्याचे समजते.

तरी जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊन संबंधित विभागाचे कार्य सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्यासह राहुरीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News