म्हणूनच तुमच्या हाती बँकेची सूत्रे दिली!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडातील नावाजलेली बँक आहे. बँकेचा मोठा नावलौकिक आहे. सहकारी चळवळीमध्ये व जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे.

जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या हाती जिल्हा बँकेची सूत्रे दिले आहेत.

तुम्हाला बँकिंग क्षेत्राचा चांगला अनुभव असून तुम्ही महानगर सहकारी बँक अतिशय उत्तम प्रकारे चालवली आहे. या अनुभवाचा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज करताना निश्चित उपयोग होईल.

आखून दिलेल्या चौकटीत कामकाज करा. बँक नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली आणखी प्रगतीपथावर जाईल. अशी अपेक्षा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन उदय शेळके यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत नवनिर्वाचित संचालक प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

यावेळी गडाख म्हणाले,  तुमच्या सारख्या तरुण संचालकांनी बँकेत काटेकोरपणे काम करून बँक प्रगती पथावर नेण्यास बँकेचे चेअरमन यांना सहकार्य करावे.तसेच  उदयराव शेळके व  प्रशांत गायकवाड यांनी राहुरी येथे जाऊन माजी खासदार डॉ. प्रसाद तनपुरे यांची देखील भेट घेतली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe