अहमदनगर : शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा.असे साकडे या शिष्टमंडळाने ठाकरे यांना घातले.राठोड यांच्याबाबत आपण विचाराधीन असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अशी माहिती सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली.शिवसेनेला राज्यात मिळालेल्या यशाबद्दल ठाकरे यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अनिल राठोड यांच्याबाबत पक्षाने विचार करावा.असे साकडे उद्धव ठाकरे यांना घालण्यात आले.या शिष्टमंडळाच्या मागणीस ठाकरे यांनी होकार दिला आहे.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक अमोल येवले,बाळासाहेब बोराटे,राजेंद्र राठोड,परेश लोखंडे,दत्ता जाधव, योगीराज गाडे,निलेश भाकरे,रवी वाकळे,सुनील लालबोंद्रे,रवि लालबोंद्रे,संजय छजलानी,महिला आघाडीप्रमुख आशा निंबाळकर,अरुणा गोयल आदी उपस्थित होते.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उपनेते अनिल राठोड व राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्यात अटीतटीच्या निवडणुकीत राठोड यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात राठोड यांच्यासह शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.जिल्ह्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांच्याबाबत विचार करण्याची मागणी केली आहे.
- गुजरातहून तामिळनाडूला जाणाऱ्या ट्रकच्या टायरची केली परस्पर विक्री ; दोघे जण ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !…
- Tata Punch Vs Hyundai Exter कोणती कार आहे भारी ?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शपथ आणि पनामा कालवा ! काय आहे चीन कनेक्शन ?
- पाणीपट्टी वाढवण्यावर मनपा ठाम ; 3000 ऐवजी २४०० चा पर्याय
- केके रेंजवर युद्धाचा सराव : तासाभरात शत्रुची ठिकाणे शोधून केली ध्वस्त !