अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये खंड पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यांचा काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती… म्हणजेच नरभक्षक बिबट्याने शिकारीसाठी झेप घेतली आणि तोच फसला गेल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.
याबाबत अधिक महिती अशी कि, राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे बिबट्या भरदिवसा विहीरीत पडला आहे. दरम्यान, कोंढवड येथील शेतकरी गणेश मोरे हे शेतकरी विहीरीवर मोटरीचे काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या शेतकऱ्यांने बिबट्याला हुलकावणी दिल्याने बिबट्या विहीरीत पडला.
वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान शेतीच्या कामे सुरु असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना उशिरा रात्री शेतात जावे लागत आहे. यातच बिबट्याच्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भेटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|