अहमदनगर हादरले : सहा महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा खून !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्यातील पतीने आपल्या पत्नीचा भिंतीवर डोके आपटून खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे राहणारे प्रेमीयुगलाने सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता.

दोघेही मिरजगाव येथील श्रीरामनगर येथे राहत होते, त्याच्या घरी नेहाची बहीण व लहान भाऊ आले होते. त्यांच्या समोरच या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू झाले यामुळे

फिर्यादी व तिचा लहान भाऊ आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता ते  चापडगाव पुढे असताना फोन आला की नेहाने गळफास घेतला असून, तिला दवाखान्यात आणले आहे.

फिर्यादी या दवाखान्यात गेल्या असता तेथे आपली बहीण नेहा शंकर साळवे ही मयत झाली असल्याचे लक्षात आले.त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले.

पोलिस उप निरीक्षक अमरजित मोरे यांनी तातडीने तेथे भेट दिली. या घटनेबाबत मयत नेहाची बहीण दीक्षा विलास ठोसर (रा.नवसरी,गुजरात) यांच्या फिर्यादीवरून शंकर किशोर साळवे (रा. श्रीरामनगर) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

मयत नेहा हिचे कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले असता डोके आपटून तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अमरजित मोरे हे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News