अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात ‘ह्या’ ख्यातनाम सरकारी वकिलांची नियुक्ती !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेख्रा जरे यांच्या खून खटल्यात मुंबईतील ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे.

 

प्रकरणाची पार्श्वभूमी : नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेख्रा जरे यांची जातेगाव घाट, सुपा, ता. पारनेर, जि. अहमदननगर येथे संगनमताने कट करून धारदार शस्त्राचा वार करून हत्या केली होती.

यात तपासाअंती एका वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक बाळ बोठे याचे नाव पुढे आल्याने पत्रकारितेच्या क्षेत्राबरोबरच नगरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. नगरच्या राजकीय परिघात बाळ बोठे याचा राजकीय दबदबा असल्याने सुरवातीला तपासाबाबत शंका होती.

पण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी सखोल तपास करून सर्व आरोपीना जेरबंद करून भक्कम पुराव्याच्या आधारे सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

तथापि, या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तो कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या नियुक्तीच्या अनुषंगाने मयत जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी ऍड यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe