राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 34 खेळाडूंचा गौरव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- राज्यस्तरीय रायफल व पिस्तोल शुटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 34 खेळाडूंचा राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे, अहमदनगर रायफल व पिस्तोल शुटिंग क्लबचे जिल्हाध्यक्ष छबुराव काळे, प्रशिक्षक आलिम शेख, ऋषीकेश दरंदले, नितीन बोधले, साईनाथ थोरात, विठ्ठलप्रसाद तिवारी, अमोल काजळे, प्रसाद सामलेटी, सुभाष थोरात, सचिन कर्डिले आदी उपस्थित होते.

आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, परिस्थितीवर मात करुन जो पुढे जातो तोच खरा खेळाडू असतो. खेळाने युवकांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होत असते. खेळाडूवृत्ती अंगिकारल्यास तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो. खेळ मनुष्याला संयम व नियोजनाचे शिकवतो. मुलांच्या हातात मोबाईल आल्याने मुले खेळापासून दुरावत आहे. खेळात मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी देखील निर्माण झाल्या असून, शासनाकडून नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय रायफल व पिस्तोल शुटिंग स्पर्धा औरंगाबाद येथे पार पडल्या. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धा अहमदाबाद (गुजरात) येथ होणार असून, सदर खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सदर खेळाडू अहमदनगर रायफल व पिस्तोल शुटिंग क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत असून, त्यांना आलिम शेख व ऋषीकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले खेळाडू 14 वर्षा खालील एअर पिस्तोल- राज फटांगडे, वैष्णवी कसाळ, एअर रायफल- यश कोडम, ओम सानप, पार्थ धीरज, हर्षवर्धन पाचरणे, रोशनी शेख, कृपा बोधले, मोहिनी गावित, 17 वर्षा खालील एअर रायफल- जयदीप आगरकर, देवेश चतूर, इरफान सय्यद, सुमित वैरागर, राजश्री फटांगडे, वीणा पाटील, नंदिनी जगताप, तेजल वासावे, आस्था सपकाळ,

दिशा सतदिवे, ऋषीकेश थोरात, 19 वर्षा खालील एअर पिस्तोल- यश गव्हाणे, गौरव खेडकर, केदार साठे, तसेच एअर नॅशनल शूटर धनंजय नागपुरे, श्रीनिवास चव्हाण, जयेश मोगल यांचा यावेळी आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशस्वी खेळाडूंचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल घाडगे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe