उन्हाळ्यात ‘कोरोना’ पुन्हा वाढणार ?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उन्हाळ्यात संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गेल्या वर्षीच्या जुलैसारखी कोरोनास्थिती आहे. मात्र पुढील काही दिवसात कोरोनाला थोपवले नाही,तर सप्टेंबर २०२० प्रमाणे परिस्थिती उद्भवू शकेल.

अमेरिका, ब्रिटन हे समशीतोष्ण कटिबंधातील देश असून, तेथे थंडीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आणि उन्हाळ्यात मात्र कमी झाला असे दिसून आले. याउलट आपल्याकडे उन्हाळ्यात संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली होती. मुंबई महानगर प्रदेशात चाचण्यांची संख्या वाढविलेली आहे आणि बाधितांचे प्रमाण पाच टक्के आहे.

परंतु ठाण्यात काही ठिकाणी संसर्गाचा अधिक प्रसार होत असल्याचे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे. तसेच एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारस कोरोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत.रुग्णसंख्या नियंत्रणासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

मुंबईत सध्या दरदिवशी सुमारे २० हजार चाचण्या होत आहेत. तसेच प्रत्येक बाधित व्यक्तीमागे ३० संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक आहे. संसर्गाचा प्रसार होत असणारे क्षेत्र प्रतिबंधित करायला हवे अशा सूचना कृती दलाने राज्याला दिल्या आहेत. संसर्गाची तीव्रता वाढण्याआधी जोखमीच्या वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाल्यास संभाव्य मृतांचे प्रमाण कमी करता येईल.

लसीकरणाचा वेग वाढविण्यासह २४ तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करावी. तसेच ४५ आणि ६० वर्षांवरील ज्या व्यक्ती लसीकरणासाठी केंद्रापर्यत जाऊ शकत नाहीत, अशांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी लसीकरणाची सुविधा सुरू करण्याची शिफारसही कृती दलाने राज्याला केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News