अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली.
शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर उपाध्यक्ष विकास बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे,
सरपंच पुष्पा बानकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सध्या वाढत असलेली कोरोना स्थिती लक्षात घेवून शनिअमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवार (ता.१२ ) दुपारी तीन वाजता मंदिर बंद करण्यात येणार आहे. शनिवारी दिवसभर दर्शन बंद ठेवण्यात येवून रविवारी (ता.१४) रोजी दर्शन व्यवस्था पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|