सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; पुढील महिन्यापासून पगार वाढणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-1 एप्रिलपासून कामगार कायद्यात होणाऱ्या बदलानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे.

बऱ्याच काळापासून केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत.देशात 1 एप्रिल 2021 पासून नवीन वेतन संहिता लागू होण्याची अपेक्षा आहे,

त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे. दरम्यान, या बदलाचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होणार आहे.

नवीन नियमांनुसार, आपला मूलभूत पगार एकूण सीटीसीच्या 50 टक्के असेल. यासह आपला पीएफ योगदान देखील वाढणार आहे.

तसेच, सातव्या वेतन आयोगाची पगारात अंमलबजावणी झाल्यानंतर तुमच्या पगारातही वाढ होईल. 2014 मध्ये आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या, पण अद्याप त्या अंमलात आलेल्या नाहीत.

सरकार लवकरच यावरही निर्णय देणार आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे 1 कोटी कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे. यात 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 58 लाख निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे.

आयोगाच्या शिफारशीनुसार, सुरुवातीच्या कर्मचार्‍यांचे किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये करण्यात आले आहे. याशिवाय, क्लास-वन अधिकाऱ्याचा किमान पगार 56100 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन, भत्ते, पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सरकारने या व्यतिरिक्त महागाई भत्ता आणि महागाई सवलत याचे तीन हप्ते लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे रोखलेले तीन हफ्ते लवकरात लवकर देण्यात येणार आहेत, अशी ग्वाही अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe