महाविकास आघाडी सरकारची शेतकऱ्यांशी लबाडी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-ठाकरे सरकार हे लबाड सरकार आहे, हे शेतकऱ्यांशी लबाडी करणारं सरकार आहे. २ लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं या सरकारने म्हटलं होतं, पण असं काहीही झालं नाही “महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात लबाड सरकार हे आज आम्हाला पहायला मिळालं.

ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून लिहील जाईल याचं कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राणा भीमदेवी थाटात घोषित करायचं की, शेतकऱ्यांचे जे काही विजेचे मीटर आहेत कनेक्शन आहेत ते कापण्यावर आम्ही स्थगिती दिली आहे.

आणि शेवटच्या दिवशी ती स्थगिती उठवायची. ही सर्वात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवताना दिली गेलेली कारणे पूर्णपणे चूकीची आहेत. ” असा आरोप विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आज केला. केवळ सत्तेचे लचके तोडण्यासाठी सोबत राहिलेलं हे सरकार आहे.

हे सरकार नेहमी खोटं बोलत आले आहे. या सरकारने राज्यात पिकविम्याचे निकष बदलले, यामुळे या निकषांचा फायदा हा पिकविमा कंपन्यांना झाला, पण शेतकऱ्यांना झाला नाही. हे धक्कादायक असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातला सत्तारुढ पक्ष हा उघडा पडला आहे.

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभागृहाला गंभीरतेने घेतलेलं नाही, सभागृहातील ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भूमिका घ्यावी लागते,

पण उद्धव ठाकरे यांनी हे गंभीरतेने घेतलेलं नाही, हे सरकार अधिवेशन चालवू शकत नाही, हे सरकार अधिवेशनात बॅकफूटवर पडलं आहे. राज्याच्या जनतेच्या डोळ्यात सरळसरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe