अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेत कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी आढळून येतील, त्या ठिकाणचा आढावा घेऊन शाळा तीन दिवस बंद ठेवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे उपस्थित होते.
दरम्यान पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहे. करोनाचा प्रभाव वाढत आहे. शाळेत येणार्या सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचा ठराव बुधवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले आहे. याला जिल्हा परीषदेचे अधिकारी जबाबदार असून या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे यांनी केली.
शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करणेकामी सुक्ष्म नियोजन करून फेर सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या.
शिष्यवृत्ती परीक्षा जास्तीत जास्त सराव घ्याव्यात व सर्व स्तरावरिल उदिष्ट निश्चित करून ऑनलाईन स्तरावर घेण्याचे ठरले. तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व दर्जात्मक वाढीबाबत बैठकांचे आयोजन करावे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|