रेशन दुकानांतही मिळेल शालेय साहित्य!

Ahmednagarlive24
Published:

रेशन दुकानांमध्ये शिधावाटपाबरोबरच स्टेशनरी, तसेच शालोपयोगी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने ही परवानगी दिली असून, यामुळे रेशन दुकाने आता विविध वस्तू भांडारचे रूप घेणार आहेत. रेशन दुकानदारांना शिधा वाटपात मिळणारे कमिशन तुटपुंजे असल्याने त्यात वाढ करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे.

अशातच या दुकानदारांना अन्य वस्तू विक्रीसाठी ठेवण्याची परवानगी नसल्याने गेल्या काही दिवसांत मागणीचा जोर आणखी वाढला होता. या प्रकरणातील अर्थकारण लक्षात घेऊन शासनाने दरम्यानच्या काळात तांदळाच्या विशिष्ट जाती, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये यासह अनेक वस्तू विक्रीसाठीही शासनाने परवानगी दिली होती. त्यापाठोपाठ गूळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणा डाळ पीठ, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. मात्र, तरीही दुकानदारांच्या संघटनांनी राज्य शासनाकडे वाढीव कमिशनची मागणी लावून धरली होती.

याबरोबरच दुकानदारांना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे, असाही प्रस्ताव आल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या यंत्रणेने गांभीर्याने या मागण्यांकडे लक्ष दिले. त्यातूनच आता यावर उपाय म्हणून दुकानदारांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला होता. दुकानात अन्य वस्तू विक्रीला ठेवल्यास त्यातून उत्पन्न मिळू शकते, अशी कल्पना मांडण्यात आल्याने शासनाने या योजनेला हिरवा कंदील दर्शवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment