अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील मंगल कार्यालयांवर करडी नजर ठेवली आहे. ५० लोकांपेक्षा जास्त गर्दी जमवल्याप्रकरणी राजापूर येथील विठाई मंगल कार्यालय व घुलेवाडी येथील पाहुणचार मंगल कार्यालय यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी ही कारवाई केली आहे. शहरातील मंगल कार्यालयांमध्ये धुमधडाक्यात लग्न होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यातच मंगल कार्यालयाच्या बाहेर डीजेचा दणदणाट होत असल्याने दोन डीजे मालकांनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी दिला. दरम्यान शहरातील आज विविध सात मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ आयोजित केला होता.
त्या ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या, मात्र तिथे गर्दी न आढळल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात गर्दी करु नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|