अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत.
एमपीएससी परीक्षा येत्या ८ दिवसात घेण्याची शक्यता आहे. पुढच्या आठ दिवसात परीक्षा घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
आज परीक्षा पुढे ढकलल्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. रास्तारोको करत त्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केली. 14 मार्च रोजी होणारी परी़क्षा त्यानंतरच्या रविवारी म्हणजेच 21 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.
‘MPSC च्या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेणार असून मुख्यमंत्री कार्यालयातून थोड्याच वेळात प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात येईल.
दरम्यान लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|