वीज ठेकेदाराची मुजोरी !!! उभ्या ऊसाचे प्रचंड नुकसान : संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  वीज प्रशासन व ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता वीज उपकेंद्राच्या कामासाठी टॉवर उभारणी व वीजवाहक तारा टाकण्याचे काम सुरू केले.

मात्र यात शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथील शेतकऱ्यांच्या उभ्या ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संतप्त झाले शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून नुकसान भरपाई मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला. याबाबत शेतकऱ्यांनी आ.मोनिका राजळे यांचेही लक्ष वेधले.

दरम्यान, याप्रश्नी आज ठाकूर निमगावला याबाबत बैठक होणार आहे. अमरापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २२०/१३२ केव्हीए वीज उपकेंद्रासाठी औरंगाबाद नजीकच्या ताप्ती तांडा येथील ४०० केव्हीए या उच्च दाबाच्या वीज केंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अमरापूरचे वीज उपकेंद्र हे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आहे.

सध्या या कामासाठी ठाकूर निमगाव येथे टॉवर उभारणी व वीजवाहक तारा ओढण्याचे काम एका नामांकित खासगी कंपनीमार्फत  सुरू आहे. वास्तविक, हे काम सुरू करण्याआधी वीज प्रशासन व संबंधित कंपनीने ज्या त्या गावच्या शेतकऱ्यांना काम व नुकसान भरपाई संदर्भात कल्पना देणे गरजेचे होते.

मात्र, ठाकूर निमगावच्या शेतकऱ्यांना ही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या ऊस पिकाचे नुकसान झाल्याने ते संतप्त झाले व त्यांनी हे काम बंद पाडले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe