अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-विडी कामगार युनियन आयटकच्या आंदोलनाची दखल विडी कामगारांना मजुरी मिळाल्याने वादावर पडदा कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने लालबावटा विडी कामगार युनियन आयटकच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले
असून, बागडपट्टी येथील विडी कंपनीने विडी कामगारांना बुधवार (दि.10 मार्च) पासून मजुरी देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयटकचे जनरल सेक्रेटरी अॅड.सुधीर टोकेकर व उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली यांनी दिली. शहरातील बागडपट्टीत एका विडी कंपनीचे मुख्य कार्यालय असून, शहरात इतर ठिकाणी देखील त्यांच्या शाखा आहेत.

सदर विडी कंपनीने विडी कामगारांची मजुरी थकविल्याने त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला होता. विडी कामगार महिलांना उसनवारी करून कुटुंब चालवावे लागत होते. संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत सदर कंपनीच्या व्यपस्थापकाने दुपारनंतर विडी कामगारांना मजुरी देण्यास सुरुवात केली.
मजुरी मिळू लागल्याने विडी कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगर शहरात इतर चार ते पाच विडी कारखाने असून, त्यांच्याकडून वेळेवर मजुरी दिली जाते. मात्र बागडपट्टीतील विडी कारखान्याने मजुरी थकविल्याने विडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
मजुरी किमान वेतन कायदा 1963 नुसार वेतन वेळेवर देणे ही मालकाची जबाबदारी आहे. सध्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विडी कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. विडी संघटना व कारखानदारमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसून, विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
सर्व विडी कामगारांना दर महिन्याला 1 ते 5 तारखे दरम्यान मजुरीचे वाटप होणे आवश्यक असल्याची भावना अॅड.सुधीर टोकेकर यांनी व्यक्त केली आहे. मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी…..
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|