अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- सावेडी येथील परिस फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी परिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, उपाध्यक्षा रंजना वाघचौरे, संदीप वाघचौरे, कैलास उशीर, आश्विनी उशीर, योगेश खोडके, अनिता वाघचौरे, प्रियंका अकोलकर, वर्षा काळे, मयुरी कार्ले, जयेश कवडे, युवराज कराळे, अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे, अॅड.भानुदास होले, पोपट बनकर, डॉ. अमोल बागुल आदी उपस्थित होते. निकिता वाघचौरे म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन प्रकाशमान केले.

स्त्री शिक्षणाची बीजे त्यांनी रोवल्याने महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर दिसत आहे. समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाईंनी सर्वस्वी पणाला लावले.
त्यांच्या प्रेरणादायी विचाराने समाज सावरला असल्याचे त्यांनी सांगितले. महेश शिंदे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री शिक्षण चळवळीचा वटवृक्ष बहरला असून, महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांच्या महान कार्य व योगदानाने आजच्या स्त्रीला प्रतिष्ठा व सन्मान मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|