अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफच्या वतीने महिला दिनानिमित्त सोने खरेदीवर ठेवण्यात आलेल्या सोडतीमधील पाच भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षिस देण्यात आले.
पाईपलाईन रोड, यशोदानगर येथील दहिवाळ सराफच्या वतीने महिला दिनानिमित्त दहिवाळ सराफच्या वतीने सोने खरेदीवर विशेष सवलत व सोडतचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या सोडतमध्ये सुजाता काळे, शैला ठोंबरे, सविता शेळके, जया तारडे व श्रीमती मुसळे यांना पैठणीचे बक्षिस मिळाले.
दहिवाळ सराफची 43 वर्षाची परंपरा असून, जिल्ह्यात तीन तर पुणे येथे एक शाखा आहे. उत्तम प्रतीने दागिने, वेगवेगळ्या आकर्षक व्हरायटी तसेच प्रामाणिकपणे दिलेल्या सेवेबद्दल ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्त विशेष सवलत देऊन महिलांना पैठनी जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
तसेच विविध सण, उत्सव काळात आकर्षक योजना ग्राहकांना दिल्या जात असल्याची माहिती संचालक सचिन दहिवाळ यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|