नगर-जामखेड रस्त्यावर कारच्या धडकेने युवकाचा मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर-जामखेड रस्त्यावर टाकळी काझी येथे भरधाव वेगात ओव्हर टेक करण्याच्या नादात इको कारने (एमएच ०४, जेव्ही १८३१) संतोष ठोंबरे (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) या दुचाकीस्वारास (एमएच १६, टी ८०८९) जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कान्स्टेबल सचिन वनवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe