अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-शेतकर्याने बाजारभाव नसल्याने नुकताच कोबी पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर फिरवला आहे. दरम्यान हा प्रकार जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वाशेरे येथे घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वाशेरे येथील शेतकरी भागवत वाकचौरे यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात कोबीचे पीक घेतले होते.
त्यासाठी तब्बल 70 ते 80 हजार रुपये खर्चही केला. निसर्गाशी दोन हात करत पीकही जोमदार आले. मात्र ऐन काढणीच्या वेळी बाजारभाव नसल्याने शेतकर्याला डोक्यालाच हात लावण्याची दुर्दैवी वेळ आली.
त्यानंतर वैतागलेले शेतकरी वाकचौरे यांनी हा कोबी जनावरांना चारा म्हणून देण्यास सुरुवात केली. मात्र जनावरेही त्याला खाईना.
अखेर कोबी पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर फिरवून त्यांनी शेतजमीन रिती केली. अनेक आर्थिक संकटाला मात देत बळीराजा पीक घेत आहे मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|