हैदराबाद : येथील एका रिक्षाचालकाने पत्नी कुरूप दिसत असल्याचा आरोप करत तलाक दिल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर रिक्षाचालकावर मुस्लिम महिला संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद मुस्तफा हा कापड व्यावसायिक असल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. यानंतर गत जुलै महिन्यात पीडित महिला व रिक्षाचालक मुस्तफाचा विवाह झाला.
मात्र, लग्न झाल्यानंतर मुस्तफा एक रिक्षाचालक असून, त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचे घरही नसल्याचे पीडित मुलगी व तिच्या पालकांच्या निदर्शनास आले. या दरम्यान माहेरहून पैसे आणण्यासाठी मुस्तफाने पत्नीचा छळ सुरू केला.
तिला कुरूप म्हणत मुस्तफा वारंवार तिचा अवमान करू लागला. दरम्यानच्या काळात सासू-सासऱ्यांनीदेखील पीडित महिलेचा छळ केला. अनेक वेळा तिला घरात डांबून ठेवण्यात आले. माहेरच्या लोकांसोबत बोलण्यावरही सासरच्या मंडळींनी निर्बंध घातले.
वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पीडित महिला माहेरी आली. मात्र, गेल्या महिन्यात मुस्तफाने माझ्या आई-वडिलांच्या घरी आपल्याला शिवीगाळ करत तलाक दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
- ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव ; कोपरीत ५ फेब्रुवारी पर्यंत चिकन, मटण विक्रीला बंदी
- अहिल्यानगरच्या पानवाल्याची मुलगी ‘यक नंबर’ चित्रपटात
- मंत्री विखे पाटील यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने आज सन्मान
- ‘आप’त्तीपासून मुक्त झाल्यास दिल्लीचा विकास – मोदी ; पराभवाच्या भीतीपोटी आपकडून घोषणांचा पाऊस
- ‘लाडक्या बहिणीं ‘कडून लाभ परत घेण्याचा निर्णय नाही ; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट